तुझ शरण मी येतो येशू
तुझ नमन मी करितो येशू
हात उभारुनी स्तुती करुनी
जीवन माझे अर्पितो
तुझ्याच साठी जीवन माझे
वाहतो तुजला तन मन माझे
अर्पितो तुजला सर्वस्व माझे
जीवन करितो येशू नामे
तुझी स्तुती मी करितो येशू
नवे गीत मी गातो येशू
हात उभारुनी स्तुती करुनी
जीवन माझे अर्पितो
जीवनाचा तू एकच रस्ता
तारक माझा तू प्रभू ख्रिस्ता
चालक माझा तू प्रभू ख्रिस्ता
मालक माझा तू प्रभू ख्रिस्ता
गुणगान मी गातो येशू
तुझी स्तुती मी करितो येशू
हात उभारुनी स्तुती करुनी
जीवन माझे अर्पितो
Click a stanza to preview here.